Thursday, March 21, 2013

प्रतीकात्मक प्रेमाचा मदिरामय खेळ !!!!

दिवस कसे सरत गेले,तुझ्या आठवणीत झुरत गेले….
मग तोल सावरताना जरासा,न जाणे किती रिते झाले पेले….. ॥


सख्य तुझे हवे म्हणून कधी पेल दूर ढकलला होता,
तुझ्या विरहाच्या नादातच आता मी त्यांना आपलेसे केले...
आज पेल्यात तू दिसलीस....मादक अशी काचेतून हसलीस....
क्षणिक आनंद तू मिळाल्याचा म्हणून एक वेळी अनेक पेले भरले.....
आणि ते सारे रिकामे केले.......  ॥ १ ॥


पेले जाहले रिकामे पण तू अजूनही लांब का???
प्रेमाचा वर्षाव तुझ्यापरी होता होता पेल्यांना लगाम का????
तू अणि मदिरा,यातलं अंतर आता संपलय…
महाग आणि विषारी असं सुंदर combination ते बनलंय….
पण तुझी साथ अशी सहजी थोडी सुटणार???
आज पेल्यातच शुद्धीबरोबर तुझी पण आठवण बुडणार…
म्हणूनच ते सारे पेले केले रिकामे…
आणि लिहीत गेलो तुझ्या नावाचे पोवाडे,हे असे !!!!   ॥ २ ॥


शुद्धीत मग येताना आधार पुन्हा रित्या पेल्यांचा…
चढलेली 'तुझी' नशा उतरवायला 'उतारा' भिजलेल्या आसवांचा…
तुझ्या आठवणीत रमताना पुन्हा उधळेल माझा शब्द-वारू…. 
संपताना जग डोळ्यात माझ्या उरेल फक्त,




तुझ्यातला मी आणि माझ्यातली दारू…………   ॥ ३ ॥


- प्रथमेश कसालकर आणि madman



Monday, March 18, 2013

'दुसरी बाजू'


दुसर्‍या बाजूने जग किती वेगळं दिसतं,याची जाणीव अचानक का व्हावी???
"त्या जगाची पण सफर एकदा झालीच पाहिजे",अशी भावना मनी का न यावी???

वर्गात back-benchers रोज आम्ही,मस्ती आमची अमाप....
आठवडयातून एकदा बाहेर न काढल्यास,Prof नाच त्याचा ताप….
कधीतरी 'शहाण्या' मुलासारखं स्वतःहून का पहिल्या benchवर आम्ही नाही बसत???
का back-benchersच्या जोकवर आम्ही 'तिकडे' बसून नाही हसत??  ॥१॥

रोज comments पास करतो,हसतो,खिदळतो….
अभ्यास करायचा तेवढा राहून जातो….
वर्गातल्या 'हुश्शार' पोरांना पाहून हेवा वाटत नसला तरी त्यांच्यासारखं लक्ष दयावं असं कधी का वाटत नाही????
वाटलंच तर पुलाखालून एवढा 'अभ्यास' वाहून गेल्यासारखी आम्ही शहाणे का होत नाही???? ॥२॥

बाहेर काढलं जाण्याचा कंटाळा येतो कधी,
तरीही बंडखोर म्हणून Department मधे 'Famous' करण्यात येतं….
तो Tag सांभाळण्याची इच्छा नसली तरी आपोआप सगळं जुळून का येतं???
चूक नसताना वर्गाच्या बाहेर आम्हालाच का काढला जातं????  ॥३॥

'वर्गात पहिलं यावं' ही ईर्षा नाही मनात,
पण 'All-Clear' असावं अशी 'स्वप्नं' नेहमीच आम्ही बाळगतो....
स्वप्नांना सत्यात उतरवतानाचे प्रयत्न नेहमी Exam च्या वेळीच का कमी पडतात???
षंढासारखे हसत Result बघताना,पुन्हा पुन्हा KT पापर देताना आमची आम्हाला लाज का नाही वाटत??? ॥४॥

अशी जाणीव झाली यात धन्यता मानतात काही,
ही जाणीव झालेल्यांना वाळीत टाकण्यात काहीजण नाही करत कुचराई….
'शहाणं' होण्याची किंमत आम्ही इच्छा नसताना का चुकवायची???
दुसऱ्या बाजूने जग बघण्याची इच्छा मनात कधीपर्यंत मारत राहायची???  ॥५॥

- madman