Monday, February 24, 2014

काळ्या मण्यांचं स्वप्न !!!



पूर्वांक :

तुझं काळ्या मण्यांचं स्वप्न,
माझी वाट बघत स्वप्नातीत राहिलं.
एकच प्रश्न माझा;
त्या स्वप्नाला पण पडली होती का स्वप्नं, "आपली" ????


मध्यांक :

माझं मन,
माझी नजर,
माझे मातीचे पाय,
माझा गर्व,
माझा तुटका स्वाभिमान,
माझी आठवणींच्या हिंदोळ्यापायी असलेली लाचारी;
तू समजून घेशील का???
  काळ-वेळ उलटून गेल्यावरही,
  मलाच जाणवणारं माझा सुन्न-भग्न मन,
पुन्हा एकवार आज;
तू उमजून घेशील का???


उत्तरांक :

तरीही सांगतो ऐक;
  मी जसा जगलो,
  तसाच मी मेलो.
         तुझ्या भविष्याचा विचार न करता,
         तुझ्या वर्तमानाला किंमत न देता,
         तुझ्या भूतकाळाची फिकीर न करता.
सलत राहिला तो एकच काटा;
तुझ्या काळ्या मण्यांचा स्वप्नांचा.
तुझ्या स्वप्नातच राहिलेल्या,
 ' आपल्या काळ्या मण्यांच्या स्वप्नाचा'.


अलविदा !!!

1 comment:

  1. kay re he??? konacha swapn ahe kalya manyancha??? lagna vagaire tharla kay??

    ReplyDelete