दिवस कसे सरत गेले,तुझ्या आठवणीत झुरत गेले….
मग तोल सावरताना जरासा,न जाणे किती रिते झाले पेले….. ॥
मग तोल सावरताना जरासा,न जाणे किती रिते झाले पेले….. ॥
सख्य तुझे हवे म्हणून कधी पेल दूर ढकलला होता,
तुझ्या विरहाच्या नादातच आता मी त्यांना आपलेसे केले...
आज पेल्यात तू दिसलीस....मादक अशी काचेतून हसलीस....
क्षणिक आनंद तू मिळाल्याचा म्हणून एक वेळी अनेक पेले भरले.....
आणि ते सारे रिकामे केले....... ॥ १ ॥
पेले जाहले रिकामे पण तू अजूनही लांब का???
प्रेमाचा वर्षाव तुझ्यापरी होता होता पेल्यांना लगाम का????
तू अणि मदिरा,यातलं अंतर आता संपलय…
महाग आणि विषारी असं सुंदर combination ते बनलंय….
पण तुझी साथ अशी सहजी थोडी सुटणार???
आज पेल्यातच शुद्धीबरोबर तुझी पण आठवण बुडणार…
म्हणूनच ते सारे पेले केले रिकामे…
आणि लिहीत गेलो तुझ्या नावाचे पोवाडे,हे असे !!!! ॥ २ ॥
शुद्धीत मग येताना आधार पुन्हा रित्या पेल्यांचा…
चढलेली 'तुझी' नशा उतरवायला 'उतारा' भिजलेल्या आसवांचा…
तुझ्या आठवणीत रमताना पुन्हा उधळेल माझा शब्द-वारू….
संपताना जग डोळ्यात माझ्या उरेल फक्त,
तुझ्यातला मी आणि माझ्यातली दारू………… ॥ ३ ॥
- प्रथमेश कसालकर आणि madman
धन्यवाद मित्रा...!!!
ReplyDelete