दुसर्या बाजूने जग किती वेगळं दिसतं,याची जाणीव अचानक का व्हावी???
"त्या जगाची पण सफर एकदा झालीच पाहिजे",अशी भावना मनी का न यावी???
वर्गात back-benchers रोज आम्ही,मस्ती आमची अमाप....
आठवडयातून एकदा बाहेर न काढल्यास,Prof नाच त्याचा ताप….
कधीतरी 'शहाण्या' मुलासारखं स्वतःहून का पहिल्या benchवर आम्ही नाही बसत???
का back-benchersच्या जोकवर आम्ही 'तिकडे' बसून नाही हसत?? ॥१॥
रोज comments पास करतो,हसतो,खिदळतो….
अभ्यास करायचा तेवढा राहून जातो….
वर्गातल्या 'हुश्शार' पोरांना पाहून हेवा वाटत नसला तरी त्यांच्यासारखं लक्ष दयावं असं कधी का वाटत नाही????
वाटलंच तर पुलाखालून एवढा 'अभ्यास' वाहून गेल्यासारखी आम्ही शहाणे का होत नाही???? ॥२॥
बाहेर काढलं जाण्याचा कंटाळा येतो कधी,
तरीही बंडखोर म्हणून Department मधे 'Famous' करण्यात येतं….
तो Tag सांभाळण्याची इच्छा नसली तरी आपोआप सगळं जुळून का येतं???
चूक नसताना वर्गाच्या बाहेर आम्हालाच का काढला जातं???? ॥३॥
'वर्गात पहिलं यावं' ही ईर्षा नाही मनात,
पण 'All-Clear' असावं अशी 'स्वप्नं' नेहमीच आम्ही बाळगतो....
स्वप्नांना सत्यात उतरवतानाचे प्रयत्न नेहमी Exam च्या वेळीच का कमी पडतात???
षंढासारखे हसत Result बघताना,पुन्हा पुन्हा KT पापर देताना आमची आम्हाला लाज का नाही वाटत??? ॥४॥
अशी जाणीव झाली यात धन्यता मानतात काही,
ही जाणीव झालेल्यांना वाळीत टाकण्यात काहीजण नाही करत कुचराई….
'शहाणं' होण्याची किंमत आम्ही इच्छा नसताना का चुकवायची???
दुसऱ्या बाजूने जग बघण्याची इच्छा मनात कधीपर्यंत मारत राहायची??? ॥५॥
- madman
No comments:
Post a Comment