Monday, April 7, 2014

पण मी तिला पाहिलंच नाही.....



तुझ्या काळ्या मण्यांच्या वास्तवाने घात केला का प्रतिभेचा ???
की कुऱ्हाड पाडलीस तू त्या विहिरीत, स्वतःहून ???
ती परी अजूनही उभी आहे तिथे, पण तिच्याकडे  देण्यासारखं काहीच नाही.
कारण रहाटगाडग्यात फसलेली तू आणि कुऱ्हाडीचं गणित तिच्या जादुई दुनियेला वळणार नाही.
पण मी तिला पाहिलंच नाही.....


तुझे निर्णय, तुझा आयुष्य.
तुझीच निराशा अन तुझं भविष्य.
आता वह्यांची देवाण-घेवाण नाही.
तुला हाक मारून भेटण्याचं प्रयोजन नाही.
कारणं शोधावी लागतात आता,
कारण कारणं शिल्लक असली तरी ती दयायचा खोटेपणा मनाला धजावत नाही.
पण मी तिला पाहिलंच नाही.....


संसारातला तुझा नवा संसार,
भूतकाळाशी घेतलायस का काडीमोड???
सदयस्थितीस कारणीभूतांची यादी करावी???
की टीकेचा आधार घेऊन तुझी कुऱ्हाड परत आणावी???
प्रश्न अनेक असले अरी प्रश्न एकच उरतो.
त्याला उत्तर नाही आपणाकडे,
आणि काळ; भविष्य सांगायला तयार नाही.
कोणे एके वेळी, भेटायचो आपण.
काळ लोटला, पण मी तिला पाहिलंच नाही.....


          - madman

No comments:

Post a Comment