एका पावसाची कविता....
'त्या'ची कविता :
तो भुरभुरला की तिच्या लडिवाळाची आठवण येते....
तो कोसळला की त्यात चमकणारी वीज,तिच्या रागाची असते.....
तो रूसला की तिची मनधरणी करावी अशी इच्छा होते....
आणि तो निघून गेला की उगाच कुठेतरी हूरहुर लागून राहते....
'ति'ची कविता :
कधीही यावे,त्याने बरसावे अन् मला चिंब भिजवावे....अमर्याद प्रेम कोसळून त्याने मला आनंदित करावे.....
तो सकाळी पडला तर वाफळत्या कॉफीबरोबर समरस होतो....
तो दुपारी पडला तर 'त्या'च्या आठवणीत ओला होतो....
तो संध्याकाळी पडला तर गरम कांदाभजीत तेलकट होतो.....
अन् तो रात्री पडला तर 'त्या'च्या बहुपाशत विलीन होतो....

No comments:
Post a Comment