Wednesday, May 7, 2014

तरीही माझा देश महान, तरीही आपला देश महान !!!

न्यायालयाची सुप्त संज्ञा अन्याय,
सुरक्षाखात्यांची पण केली आम्ही राख;

स्त्री-पुरुष-बालक यांच्यावर वासनेची गदा,
तर गुन्हा करणारे-बलात्कारित खुलेआम फिरतात राजोरास;

आम्ही फक्त मुगच गिळतो,
कारण डोळ्यांवरच्या पडद्यांना अपचनाची साथ;

साठी उलटली तरी आमचे दात अजूनही कोवळेच,
यात आमचा मिंधा अपमान;

आम्हास मात्र दिसतो संस्कृतीमय भारत,
विविधांगी रंग-ढंगांचा त्याला साज;

सर्वनाश आमचा जवळच आहे,
त्या वादळाची ही ललकार;

पण आम्ही मात्र शोभायात्रा काढून भागवतो भित्र्या, परावलंबी, मवाळ, विचारशून्य, Senseless मनाची तहान,
जात-धर्म-भाषा-प्रांत यापैकी कोणीच नाही त्याला अपवाद;

तरीही माझा देश महान,

तरीही आपला देश महान !!!


-madman , यशोधन प्रांजाहिता शेवडे

Sunday, May 4, 2014

जीर्ण पानं.

जीर्ण झालेल्या पानांना वारा तरी आसरा देईल काय??
सुखत चाललेल्या देठांची जाणीव कोणाला कधी होईल काय??
नवीन उमललेल्या कळ्यांना अनुभवाचे शब्द कोण सांगील??
आणि न पडलेल्या जबाबदारीची जाणीव त्यांना नेमकी कधी होईल??

व्यथा त्या मनांची कधी आपणास कळेल??
पिचलेल्या मनांची कुठवर जाईल??
त्यांच्या भविष्याची स्वप्नं चुरडताना आपल्याला काय वाटेल??
कदाचित तेच आपलंसुद्धा भवितव्य ठरेल.

आयुष्याचा फासा कसाही पडलेला असूनदे,
शेवट सगळ्यांचा ठरलेलाच असतो.
जीवनाच्या सारीपाटावर प्यादी पुढे सरकली तरी ती आठवणीतच गुंतलेली असतात.
त्या आठवणीतच गुंफलेली असतात;
त्यांच्या तुटलेल्या आशा, अपेक्षा आणि नसलेलं भविष्य.
मात्र, वर्तमानच नसलेल्या ह्या जीर्ण देहांना आधाराची काठी भविष्यात कोण देईल काय??